प्रवेशोत्सव प्रथमवर्ष २०२६-२७ आणि शिक्षकदिन
बा. मो. वा. सोसादन अध्यापिका विद्यालयामध्ये दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचा तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षणातील अतुलनीय योगदानाला आदर करून त्यांचा जन्मदिवस म्हणून “शिक्षक दिनाचा” कार्यक्रम साजरा केला. कार्यक्रमामध्ये आयोजन सांस्कृतिक विभागामार्फत डॉ. प्राची चौधरी मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी राणी टाकणे या विद्यार्थिनीने केले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींचे स्वागत श्विरा पोटफोडे या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने केले. तसेच शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाची प्रस्तावना द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी श्रावणी मोरे हिने केली. प्राचार्य. डॉ. अक्षिनी पालवणकर मॅडम व उपस्थित सर्व शिक्षकवृंद यांनी सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलन केले. द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी श्रुतीका वाघ शिक्षक दिनानिमित्त काव्यवाचन केले. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी प्रतिक्षा हिने काव्यवाचन केले. यानंतर द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी मनिषाने शिक्षकांना मानपत्र वाचन केले. प्रथमवर्षाच्या विद्यार्थिनींचे प्रतिक्षा मूळे, प्रतिमा सोनावणे यांनी शिक्षक दिनानिमित्त सादरीकरण केले. या प्रसंगी डॉ. प्रथमेेश कोलते सर व प्राचार्या. डॉ. अक्षिनी पालवणकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्वतःमधील कौशल्ये विकसित करण्यावर भर द्यावा असे आवाहन केले. त्यानंतर प्रथम वर्षाची विद्यार्थिनी प्रतिक्षामूळे हिने प्रथम वर्षाच्या वतीने स्वागत केलेल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
नंतर प्रथम वर्षाच्या व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी शिक्षकांना आदरयुक्त भेटवस्तू प्रदान केली. तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींना व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींना भेटवस्तू देऊन स्वागत व कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर द्वितीय वर्षाची विद्यार्थीनी श्रावणी मोरे हिने सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न केला. डॉ. प्राची चौधरी मॅडम यांनी कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यामुळे सर्व मुलींचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी फलक लेखन पल्ली सोनावणे, ममता बारटे, प्रतिक्षा सोनावणे, दिशा शेटे या विद्यार्थिनींनी केले. बैठक व्यवस्था श्विरा पोटफोडे या विद्यार्थिनीने केली. कार्यक्रमाचे व्हिडिओ व फोटो स्नेहा गवते हिने काढले. कार्यक्रमासाठी लागणारी माईक व्यवस्था, जोडणी गजानन भोरकर यांनी केली. कार्यक्रमासाठी लागणारे साहित्य व आभारासाठी श्विरा पोटफोडे, प्रतिक्षा सोनावणे, वेदांती शिंदे या विद्यार्थिनींनी केले.
सांस्कृतिकप्रमुख
डॉ. प्राची चौधरी.







