८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा

पुणे सेवासदन संस्थेचे बा.मो. वा. सेवासदन अध्यापिका विद्यालय,कै.ध.रा.पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळा व श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ प्राथमिक शाळा यांनी एकत्रितपणे भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.
सेवासदन अध्यापिका विद्यालयाच्या स्वेच्छानिवृत्त होत असलेल्या ज्येष्ठ शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती फसाबाई साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सेवासदन अध्यापिका विद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अश्विनी गद्रे पालवणकर मॅडम, सराव पाठशाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सोनवणे मॅडम, रमाबाई रानडे प्रौढ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राऊत मॅडम आणि पालक शिक्षक संघाचे सदस्य उपस्थित होते.
धजारोहणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरम , राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत इत्यादी परिपाठ सादर केला. त्यानंतर सराव पाठशाळा आणि प्रौढ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीते सादर केली.सेवासदन सराव पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर संगीत कवायत सादर केली.
‘प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून देशसेवेत योगदान द्यावे’ अशा शब्दांत माननीय प्राचार्य डॉ. पालवणकर मॅडम यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले आणि चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Scroll to Top