लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कै.ध.रा.पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेत शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या दिवशी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांची वेशभूषा केली होती . या निमित्ताने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी छान छान गोष्टी सांगितल्या. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी टिळकांच्या बालपणातील प्रसंगावर आधारित गीत सादर केले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या बोधप्रद घटना सांगितल्या. तसेच अण्णाभाऊ साठे यांची माहिती सांगितली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्यावर आधारित गीते सादर केली. शिवाय चौथीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंगही सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा ,भाषण कौशल्य , पाठांतर या गुणांचा विकास व्हावा तसेच अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक या महापुरुषांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. या कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षिका डॉ. प्रिया निघोजकर मॅडम यांनी केले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.







