गुरुपौर्णिमा कार्यक्रम

कै. ध. रा. पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेत बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी माननीय वैशाली जोशी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याशिवाय पुणे सेवासदन संस्थेच्या सहसचिव शहाणे मॅडम कार्यक्रमास उपस्थित होत्या. व्यास महर्षींच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. ‘प्रणाम प्रभुजी तुला’ हे ईशस्तवन शाळेतील शिक्षिका सौ. गीता जाधव मॅडम यांनी सादर केले. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी गुरूमहतीपर विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

 

इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी गुरुस्तवन आणि गुरु शिष्यांवर आधारित पौराणिक गोष्टी सांगितल्या. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरुशिष्य परंपरेतील गोष्टी सादर केल्या. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद , महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले , महात्मा गांधी, पाणिनी इत्यादी कथांचा त्यात समावेश होता. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरूंची महती सांगणारी नाटिका सादर केली. त्याद्वारे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार व वाचनाचे महत्त्व बिंबवण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले . वाचनाचे महत्त्व सांगितले. शेवटी आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली . वरील कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका सौ. गीता जाधव मॅडम यांनी केले.

Scroll to Top