इयत्ता बारावी पालक सभा अहवाल
दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी इयत्ता बारावीची पालक सभा प्रशालेच्या डिजिटल रूम मध्ये संपन्न झाली
सदर पालक सभेसाठी कला शाखा व वाणिज्य शाखा इयत्ता बारावीचे पालक उपस्थित होते. पालक सभे ची सुरुवात इयत्ता बारावी कला शाखेच्या वर्गशिक्षक श्रीमती खाडे मॅडम यांच्या प्रास्ताविकेने झाली.
पालक सभेला संबोधित करताना माननीय प्राचार्य श्रीमती बोळकवठेकर मॅडम यांनी विविध विषयावरती पालकांना संबोधित केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये प्राचार्य मॅडम यांनी प्रामुख्याने पुढील विषयाचा उहापोह केला
विद्यार्थिनींची असणारी गैरहजेरी, विद्यार्थिनींची शैक्षणिक प्रगती , विद्यार्थिनींच्या शिस्तीबाबतच्या तक्रारी, इयत्ता बारावी वर्षाचे शैक्षणिक महत्त्व, विद्यार्थिनींचे वर्तन इत्यादी बाबत सविस्तर चर्चा केली गेली. तसेच मान्य प्राचार्य यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थिनींमध्ये अपेक्षित असणारे बदल किंवा त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आवश्यकता सूचनाही देण्यात आल्या. पालक सभेची सांगता इयत्ता बारावी वाणिज्य शाखेचे वर्गशिक्षक श्री सरडे सर यांनी आभार प्रदर्शन करून करण्यात आली.
तदनंतर प्रत्येक पालकांना त्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगत समजण्यासाठी प्रथम घटक चाचणीतील सर्व विषयांचे मार्क दाखवण्यात आले व त्या अनुषंगाने पालकांशी चर्चा करण्यात आली व विद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुधारणा होण्यासाठी सूचना देण्यात आल्या..





