मंगळागौर

दिनांक- 28/8/25
स्थळ – बा. मो. वा सेवासदन अध्यापिका विद्यालय पुणे 30
दिनांक 28 ऑगस्ट 2025 श्रावण महिन्यानिमित्त श्रावणी शुक्रवार, मंगळागौर खेळांचे कॉलेजमध्ये  आयोजन करण्यात आले. सुरुवातीला महादेवाच्या पिंडीची पूजा करून खेळायला सुरुवात केली. प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. सर्व जणी नऊवारी साड्या घालून छान नटून आल्या होत्या. प्रथम वर्षातील एका छात्राध्यापकेनी सर्व खेळांची माहिती एक एक करून मुलींना दिली. व त्यांच्या मागे सर्व क्षेत्राध्यापकांनी ते खेळ खेळले. फेर धरणे ,बस फुगडी ,साधी फुगडी ,काठवट काना लाट्या बाई लाट्या , किस बाई किस , कोंबडा इत्यादी प्रकारचे खेळ खेळण्यात आले. त्यावेळी कॉलेजच्या प्राचार्य प्रा. अश्विनी पालवणकर मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. रेणुका जाधव मॅडम उपस्थित होत्या. विविध प्रकारचे पारंपारिक खेळ खेळण्यात आले. प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या सर्व छात्र अध्यापिकांनी आनंदाने सहभाग घेतला होता.
 
 
 
Scroll to Top