बालदिन
कै. ध. रा. पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेत शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
बालदिनानिमित्त बुधराणी हॉस्पिटल तर्फे सर्व विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. सर्व विद्यार्थी रंगीत पोशाखात शाळेत आले होते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना पंडित नेहरूंविषयी माहिती सांगितली. त्यांचे लहान मुलांवर कसे प्रेम होते याविषयीची गोष्टही सांगितली .
मुले म्हणजे देवाघरची फुले या निरागसतेचे प्रतीक म्हणून सर्व विद्यार्थ्यांना गुलाबाची फुले देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. संगीतखुर्ची हा मनोरंजक खेळही घेण्यात आला. विद्यार्थ्यांना रंगीबेरंगी फुगे दिले . खेळानंतर मुलांना त्यांच्या आवडीचा खाऊही देण्यात आला.सर्व मुले खूप खुश होती.