योगदिन
शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी कै.ध.रा.पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेत, सेवासदन अध्यापिका विद्यालय, सेवासदन प्रौढ प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.
योगशिक्षिका कु. ज्ञानल जोशी आणि कु. तनिष्का निघोजकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग प्रात्यक्षिकांचे मार्गदर्शन केले. सुरुवातीला हलके व्यायामप्रकार त्यानंतर उभी आसने, बैठी आसने आणि सूर्यनमस्कार घेण्यात आले. शेवटी शिक्षिका सौ. धनश्री ढुमे यांनी शिथिलीकरण आणि स्वास्थ्य संगीतासोबत ध्यान घेतले. उत्तम स्वास्थ्यासाठी नियमित योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले.
योगदिन कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापिका प्रा. अश्विनी पालवणकर मॅडम यांनीही सहभाग घेतला.
वरील कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका डॉ. प्रिया निघोजकर यांनी केले.










