शिवजयंती

कै.ध.रा.पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळेत शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने मावळ्यांची, बालशिवाजी आणि जिजामातेची वेशभूषा केली होती. सर्व विद्यार्थ्यांनी शिवरायांची गारद सादर करत बालशिवाजींचे मंचावर स्वागत केले. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अश्विनी गद्रे पालवणकर मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. इयत्ता चौथीतील विद्यार्थिनींनी  ‘ राजं आलं जिंकूनिया जगभरी ‘ या गीतावर सुंदर नृत्य सादर केले. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा या प्रसंगाचे सादरीकरण केले . प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती रंजना सोनवणे मॅडम यांनी ‘शिवबाचे गोंधळी आम्ही शिवबाचे गोंधळी’ हे गीत स्वतः सादर केले आणि विद्यार्थ्यांकडूनही म्हणवून घेतले. वरील सर्व कार्यक्रमाचे नियोजन  इयत्ता चौथीच्या शिक्षिका धनश्री ढुमे यांनी  केले.

Scroll to Top