समग्र प्रगती पत्रकाची वैशिष्ट्ये
समग्र प्रगती पत्रक …..
- बालकांच्या शैक्षणिक प्रगतीचे सर्वांगीण मुल्यांकन करते.
- सर्वांगीण मूल्यांकनात शैक्षणिक मुल्यमापनासोबतच बौद्धिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक व नैतिक विकासाचे मुल्यांकन करते.
- पायाभूत स्तरावर भारतीय ज्ञान प्रणालीतील पंचकोशावर आधारित मूल्यांकनाचा समावेश आहे.
- बालकांच्या शैक्षणिक प्रगतीचे ३६० ० तून मुल्यांकन करते.
- सतत व सर्वसमावेशक मूल्यांकन करते म्हणजेच वर्षभरातील निरीक्षण, उपक्रम, प्रकल्प, कृती व प्रत्येक कृतीतील सहभागाच्या आधारे मूल्यांकन करते.
- गुणांसोबतच वर्णनात्मक अभिप्राय देते. वर्णनात्मक अभिप्रायात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत सकारात्मक, सुधारणात्मक आणि मार्गदर्शक अभिप्राय देते.
- कौशल्याधारित मूल्यमापन करते म्हणजेच विविध जीवनकौशल्ये, सर्जनशीलता, संवादकौशल्य, सहकार्य, समस्या सोडविण्याची क्षमता यांचे मुल्यांकन करते.
- प्रत्येक विद्यार्थ्याच्या आवडीनिवडी, क्षमता व प्रगतीचा विचार करणारे मूल्यमापन करते म्हणजेच विद्यार्थी-केंद्रित दृष्टीकोनातून मूल्यमापन करते.
- विद्यार्थ्यांच्या विविध आवडींचा समावेश, अभ्यासक्रम ध्येय्यानुसार असलेल्या क्षमतेवर आधारित कृतीचा समावेश ,कृतीवर आधारित मुल्यांकन प्रश्नांचा समावेश,मुल्यांकन रुब्रीकचा समावेश .
- मुल्यांकन रुब्रीकमध्ये जाणीवजागृती,संवेदनशीलता,सर्जनशीलता, प्रारंभिक(निर्झर) ,प्रगत (पर्वत),प्रवीण (आकाश )अशा ३*३ च्या मुल्यांकन रुब्रीकचा समावेश.
- विद्यार्थ्यांना स्वतःचे व सहाध्यायांचे मूल्यमापन करण्याची संधी आहे म्हणजेच स्व-मूल्यांकन व सह-मूल्यांकन करण्यास त्रिस्तरीय पदनिश्चयन श्रेणीचा वापर .
- पालकांच्या अभिप्रायासही वाव आहे.
- प्रत्येक विभागानुसार (विषयानुसार) शिक्षकांच्या अभिप्रायाचे गुणात्मक वर्णन परीक्षा भिती कमी करून शिकण्यावर भर, तणावमुक्त मूल्यांकन पद्धती .
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेशी सुसंगत.
- पायाभूत स्तर ,पूर्वतयारी स्तर,पूर्वमाध्यमिक स्तर,माध्यमिक स्तर या चारही स्तरांवर समग्र प्रगती पत्रकातून विद्यार्थ्यांचे मुल्यांकन.
डॉ.प्राची राहुल चौधरी
सेवासदन अध्यापिका विद्यालय पुणे .
सदस्य –समग्र प्रगती पत्रक (HPC)पायाभूत स्तर (MSCERT पुणे)
