360° मूल्यमापन –सर्वांगीण विकासाच्या मुल्यांकनासाठीचे एक पाऊल
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार प्रत्येक बालकाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचे 3600 तून मूल्यमापन केल्या जाईल हे आपल्याला समजले.बालकांचा सर्वांगीण विकास व प्रगतीचे मुल्यांकन करण्यासाठी केंद्र स्तरावर PARAKH (Performance, Assessment, Review and Analysis of Knowledge for Holistic development) ची स्थापना करण्यात आली. 3600 तून सर्वांगीण विकासाचे मुल्यांकन करण्यासाठी समग्र प्रगतीपत्रकाची (Holistic Progress Card) संकल्पना मांडण्यात आली. समग्र प्रगतीपत्रकात बालकांच्या शैक्षणिक प्रगतीचे वर्णनात्मक मुल्यांकन केलेले असते त्यात त्यांच्या शैक्षणिक प्रगती सोबतच सामाजिक विकास,भावनिक विकास ,सर्जनशीलता व व्यावसायिक कौशल्याचा देखील समावेश आहे.महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पायाभूत स्तरासाठी समग्र प्रगतीपत्रकात बालकांच्या प्रगतीच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात झाली आहे.यात पायाभूत स्तरामधील अभ्यासक्रमाची क्षेत्रे(curriculum domain), अभ्यासक्रमाची ध्येय्ये(curriculum goal) आणि त्यानुसार असणाऱ्या क्षमतांच्या(competencies) मूल्यांकनाच्या नोंदी करावयाच्या आहेत.तसेच प्रत्येक बालक संबंधित संकल्पनेच्या बाबतीत जाणीवजागृती(Awareness),संवेदनशीलता(Sensitivity),सर्जनशीलता(Creativity ) या तीन क्षमतांमध्ये निर्झर (Stream),पर्वत (Mountain)आणि आकाश (Sky) यापैकी कोणत्या स्तरावर आहे याची नोंद करावयाची आहे. पायाभूत स्तरासाठी अभ्यासक्रम क्षेत्रामध्ये एकूण पाच विकास क्षेत्र आहेत . शारीरिक विकास क्षेत्र ,सामाजिक,भावनिक,नैतिक विकास क्षेत्र,बोधात्मक विकास क्षेत्र, भाषा आणि साक्षरता विकास क्षेत्र, सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास क्षेत्र आणि याच क्षेत्राचा आणखी एक भाग म्हणजे सकारात्मक अध्ययन सवयी विकास क्षेत्र.
पायाभूत स्तरावरील शारीरिक विकास(Physical Development) क्षेत्रामध्ये एकूण तीन अभ्यासक्रम ध्येय आहेत आणि एकूण 16 क्षमता आहेत. सामाजिक, भावनिक, नैतिक विकास(Socio-Emotional Development) या विकास क्षेत्रामध्ये एकूण तीन अभ्यासक्रम ध्येय आहेत आणि एकूण नऊ क्षमता आहेत. बोधात्मक विकास (Cognitive Development)क्षेत्रामध्ये दोन अभ्यासक्रम ध्येय आहेत आणि एकूण 16 क्षमता आहेत. भाषा आणि साक्षरता विकास (Language Development) या विकास क्षेत्रामध्ये एकूण तीन अभ्यासक्रमाची ध्येय आहेत आणि एकूण 18 क्षमता आहेत. सौंदर्यदृष्टी आणि सांस्कृतिक विकास( Aesthetic and Cultural Development ) या विकास क्षेत्रामध्ये एक अभ्यासक्रम ध्येय आहे आणि त्यात एकूण पाच क्षमता आहेत. तसेच याच विकास क्षेत्राचा भाग असलेल्या सकारात्मक अध्ययन सवयी (Positive Learning Habits )या विकास क्षेत्रामध्ये एक अभ्यासक्रम ध्येय आणि एकूण चार क्षमता आहेत.
याची अधिक माहिती आपण पुढे पाहू या.
डॉ.प्राची राहुल चौधरी
सेवासदन अध्यापिका विद्यालय पुणे .
सदस्य –समग्र प्रगती पत्रक (HPC)पायाभूत स्तर (MSCERT पुणे)
