स्वातंत्र्यदिन

पुणे सेवासदन संस्थेचे बा.मो. वा. सेवासदन अध्यापिका विद्यालय,कै.ध.रा.पोंक्षे सेवासदन सराव पाठशाळा व शिशुशाळा, श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ प्राथमिक व प्रौढ माध्यमिक शाळा यांनी एकत्रितपणे भारताचा 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला.  
        सेवासदन अध्यापिका विद्यालयाच्या माननीय प्राचार्य व राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पुणे सेवासदन संस्थेचे सरचिटणीस श्री. चिंतामणी पटवर्धन सर आणि सहसचिव श्रीमती अर्चना शहाणे मॅडम याही उपस्थित होत्या.
          धजारोहणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत इत्यादी परिपाठ सादर केला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीते सादर केली.सेवासदन सराव पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर संगीत कवायत सादर केली. तसेच सेवासदन अध्यापिका विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी  ससाहित्य कवायत प्रकार सादर केले.यामध्ये निशाण कवायत आणि डंबेल्स कवायत प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.
         “प्रत्येक नागरिकाच्या मनात देशाप्रती निष्ठा असेल तरच भारत जगामध्ये स्वाभिमानाने विश्वगुरू म्हणून जगाचे प्रतिनिधित्व करू शकेल.” अशा शब्दांत माननीय  प्राचार्य डॉक्टर मेधा कुलकर्णी मॅडम यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले आणि चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Scroll to Top