शिक्षक दिन

स्थळ :- बा. मो.वा सेवासदन अध्यापिका विद्यालय पुणे 30

दि. 8 सप्टेंबर 2025

 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी ईद असल्यामुळे विद्यालयाला सुट्टी होती. म्हणून सेवासदन अध्यापिका विद्यालय मध्ये शिक्षक दिन हा 8 सप्टेंबर 2025 रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सर्व तयारी प्रथम वर्षातील छात्र अध्यापिका व द्वितीय वर्षातील छात्राध्यापिकांनी केली होती. सूत्रसंचालन हिंदवी गोडांबे हिने केले. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रार्थना घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैदही शिंदे यांनी केले.
नंतर सर्व शिक्षक प्राध्यापकांचा पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रथम वर्षातील विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व त्यानंतर द्वितीय वर्षाच्या काही विद्यार्थीनींनी शिक्षक दिनानिमित्त भाषण केले. त्यानंतर प्राध्यापक कोल्हे सर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
त्यानंतर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य प्रा.अश्विनी पालवणकर मॅडम यांनी विद्यार्थिनीना शिक्षक दिनानिमित्त मार्गदर्शन केले. अस्मिता वडघुले हिने कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
Scroll to Top