समग्र प्रगती पत्रकातील मुल्यांकन रुब्रिक
आज आपण समग्र प्रगती पत्रकातील मुल्यांकन रुब्रिक समजून घेऊ या ….
बालक जेव्हा एखादी कृती वर्गामध्ये करते तेव्हा त्या कृतीचे निरीक्षण करून मूल्यांकन करताना 3×3 च्या मूल्यांकन रुब्रिकनुसार समग्र प्रगती पत्रकात नोंदविले जाते. 3×3 मूल्यांकन रुब्रिकमध्ये जाणीवजागृती, संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि पायाभूत स्तरावर निर्झर, पर्वत आणि आकाश या क्षमतानिहाय कामगिरी स्तर दर्शकांमध्ये त्या बालकाचे मूल्यांकन केले जाते, तर पूर्वतयारी स्तरासाठी प्रारंभिक, प्रगत आणि प्रवीण या स्तरांवर मूल्यांकन केले जाते.
मूल्यांकन रुब्रिक | ![]() | |||
कामगिरी स्तर | ||||
| क्षमता | प्रवाह (निर्झर) (Stream) | पर्वत (Mountain) | आकाश (Sky) | |
| जाणीवजागृती(Awareness) | ||||
| संवेदनशीलता (Sensitivity) | ||||
| सर्जनशीलता (Creativity) | ||||
रुब्रिक हे मूल्यांकनाचे एक साधन आहे. रुब्रिक म्हणजे विशिष्ट कार्यानुसार/कृतीनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी निकषांच्या विधानांचे वर्णनात्मक एकत्र संच आहे. रूब्रिक हे साधन स्पष्टपणे लिखित, मौखिक व दृश्य अशा कृतींमधील सर्व बाबींचे निकषांच्या आधारे स्पष्टपणे विधानस्वरूपात वर्णन करते. वरील मुल्यांकन रुब्रिकमध्ये क्षमतांना अनुसरून निश्चित करण्यात आलेली कामगिरी स्तर दर्शके(Abilities Performance level Descriptors) जाणीवजागृती,संवेदनशीलता,सर्जनशीलता,प्रवाह,पर्वत व आकाश हि आहेत. या शब्दांमागील संकल्पनांचा अर्थ समजून घेऊ या.
जाणीवजागृती
कृतीचे सर्व ज्ञान विद्यार्थ्यांना असते. कृतीसाठी आवश्यक असणारे वेगवेगळे घटक आणि त्यामधील कृतीतील भूमिका याची समज विद्यार्थ्याला असते. कृती सुरु असताना विद्यार्थी त्या कृतीत पूर्णपणे गुंतलेला असतो . त्याचे संपूर्ण लक्ष कृतींवर,त्या कृतीमागील हेतुंवर केंद्रित झालेले असते.
जाणीवजागृती या कामगिरी स्तर दर्शकामध्ये विद्यार्थी प्रवाह(निर्झर),पर्वत व आकाश या स्तरावर आहे म्हणजे काय हे समजून घेऊ या.
अ.क्र. | प्रवाह (निर्झर) (Stream) | पर्वत (Mountain) | आकाश (Sky) |
|
1. | दोन ते तीन टप्पे असलेल्या कृती पूर्ण करण्यासाठी सूचनांचे पालन करतात.
| चार ते पाच टप्पे असलेल्या कृती पूर्ण करण्यासाठी सूचनांचे पालन करतात व सहाध्यायांना कृती पूर्ण करण्यासाठी सूचना देतात. | पाचपेक्षा अधिक टप्पे असलेल्या कृती पूर्ण करतो. आपल्या सहकाऱ्यांना स्पष्ट व अचूक सूचना देतात. | |
2. | पुर्वाज्ञानाशी संबंधित बाबी ओळखतो. | पुर्वाज्ञानाशी संबंधित बाबी,घटक स्पष्ट करतो. | पूर्वज्ञानाशी संबंधित कल्पनांचे सारांश काढतो. | |
3. | एखादी कृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक घटक ,त्यांची वैशिष्ट्ये याबाबत मर्यादित ज्ञान असते. | एखादी कृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक घटक ,त्यांची वैशिष्ट्ये याबाबत मर्यादित ज्ञान असते.काही वेळा कृतीसाठी लागणाऱ्या साहित्याबाबत स्पष्टता असते. | कृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबींचे आकलन असते.कृतीविषयी विशिष्ट प्रश्न विचारतो. | |
4. | संकल्पनात्मक आकलनाची कमतरता असते. | संकल्पनात्मक आकलनाचा वापर करतो.कृतीविषयी सर्वसाधारण प्रश्न विचारते. | समस्या सोडविण्यासाठी आवश्यक संकल्पनात्मक स्पष्टता असते. | |
5. | अध्ययन केलेल्या प्रक्रियांचा वापर करतो. | कृती पूर्ण करण्यासाठी तार्किक विचार करतो. | कृती पूर्ण करण्यासाठी तार्किक विचार करतो. | |
6. | इतरांच्या मदतीने समस्या सोडवितो.
| समस्या व्य्यावास्थित सोडवितो.कृतींचे ठळक मुद्दे सध्या वाक्यात सांगतो. | कृती पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या कार्य नीती वापरतो | |
7. | निरीक्षणाच्या आधारे इतरांच्या कल्पना वापरतो.
| चार ते पाच वाक्यातील सूचनांचे पालन करतो.कृतीसाठी सहाध्यायांना सूचना करतो. | विविध पैलूंशी संबंधित कल्पना ओळखतो आणि स्पष्ट करतो. कृतींचे ठळक मुद्दे पूर्ण विस्तृतपणे सांगतो. | |
8. | ओघवतेपणाचा अभाव असतो. | काहीप्रमाणात ओघवतेपणा असतो. | कृती करण्यात ओघवतेपणा असतो. | |
संवेदनशीलता
कृती करताना विद्यार्थी कृतीशी संबंधित सामाजिक नियम /पथ्य पाळून योग्य ते वर्तन करतो. भावना आणि विचारांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करून व्यक्त होतो. कृतीत भावनिकदृष्ट्या गुंतून इतरांच्या गरजा जाणून घेतो. समस्या समजून घेताना तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार करतो. कृती करताना सहानुभूतीपूर्वक, समजूतदारपणे आणि खुलेपणाने वैचारिक मत इतरांना पटवून देतो.
संवेदनशीलता या कामगिरी स्तर दर्शकामध्ये विद्यार्थी प्रवाह(निर्झर),पर्वत व आकाश या स्तरावर आहे म्हणजे काय हे समजून घेऊ या.
अ.क्र. | प्रवाह (निर्झर) (Stream) | पर्वत (Mountain) | आकाश (Sky) |
|
1. | कृतीमध्ये सहभागी होण्यास काही प्रमाणात तयारी दाखवतो. | कृतीमध्ये सहभागी होण्यास प्रमाणात तयारी दाखवतो. | आव्हानात्मक कामामध्ये उत्साह आणि रुची दाखवतो.
| |
2. | कृती मागील सर्वसाधारण कारण सांगतो. | कृती मागील एक किंवा अधिक कारणे तपशिलासह सांगतो. | कृतीच्या आवडी मागील एक किंवा अनेक कारणे स्पष्ट करतो. | |
3. | मुख्य कृतीमध्ये सहभागी होतो. | त्याविषयी भावनिक प्रतिक्रिया देतो.कृतीविषयी मत देतो.कृतीविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. | संपूर्ण कृती किंवा तिचे काही भाग पूर्ण करण्यासाठी तपशील देतो. संवेदनशील प्रश्नांना विचारपूर्वक व सविस्तर उत्तर देतो. वाचनाबद्दलच्या भावना एखाद्या पात्राविषयीची भावना ,अर्थ व्यक्त करण्यासाठी योग्य वाक्य वापरतो. नियमितपणे वैयक्तिक मते व भावना व्यक्त करतो. | |
4. | त्याला माहिती असलेल्या कृतींमध्ये आनंदाने सहभागी होतो, त्याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. | इतरांबरोबर काम करण्यात आनंद घेतात. | इतर बालकांना मदत करतो त्यामागील कारण सांगतो. कार्य पूर्ण करण्यासाठी नेतृत्व करतो .विस्तृत संभाषणात सहभागी होतो. | |
5. | कृती करताना मदत घेण्यास तयार असतात. कृती पूर्ण करण्यासाठी आपल्या सहाध्याय्यांना मदत मागतात आणि आपल्या सहाध्यायांनी तयार केलेल्या साध्या साध्या कृतींमध्ये आनंद घेतात. | कृती करताना इतरांच्या कामाचे अनुकरण करतात सहाध्यायींना मदत करतात व त्यांची मदत ही घेतात. | चर्चेदरम्यान दोन किंवा अधिक वैचारिक विषयांवर आधारित प्रश्न उपस्थित करतो. | |
6. | सहाध्यायांनी व्यक्त केलेल्या कल्पना ओळखतात, त्यांची त्यामधील मूल्य समजून घेतात. | सहाध्यायांनी व्यक्त केलेल्या कल्पनांचे व्यावहारिक मूल्य स्पष्ट करतात. | कामाबद्दल तपशीलवार भावनिक प्रतिसाद देतो. त्यातील मूल्य सांगतो. | |
7. | इतरांनी केलेल्या कामाचे कौतुक करतात. | पूर्वज्ञान व कौशल्य यांची कृती पूर्ण करण्यासाठी केलेल्या मदतीसाठी इतरांचे कौतुक करतात. नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतात. कृती पूर्ण करण्यासाठी स्वतः कल्पना मांडतात. | शिकण्याचा आनंद घेतो व शिकण्याची संधी शोधतो. | |
8. | शांततेने कृती करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कृतीचा कठीण/गुंतागुंतीचा भाग पूर्ण करण्यासाठी, नवीन गोष्टी शिकण्यासाठी, कृती पूर्ण करण्यासाठी कल्पना तयार करण्यासाठी विद्यार्थ्याला प्रोत्साहित करावे लागते.
| कृती पूर्ण करण्यासाठीच्या साध्या घटकांचे इतरांना स्पष्टीकरण देतात. कृतीविषयी छोट्या संभाषणात सहभाग घेतात. आपली वेळ येईपर्यंत वाट पाहतात मुख्य विषयाकडे आणि विचारलेल्या प्रश्नांकडे लक्ष देतात. कृती किंवा कृतीच्या काही भागाविषयी लिखित स्वरूपात आपले मत देतात. कृती करताना संयम राखतात. | समस्या सोडवण्यासाठी पूर्वज्ञान आणि कौशल्य वापरल्याचा आनंद घेतो. | |
सर्जनशीलता
विद्यार्थी समस्येवर नाविन्यपूर्ण आणि अचूक उपाय मांडतो व ते करतो. कृती कल्पकतेने करतो. विचारात लवचिकता ठेवतो. विविध शक्यतांचा शोध घेतो. कृती करताना कुतूहलाची भावना आणि शोध घेण्याची इच्छा दर्शवीतो. वेगवेगळ्या अंगाने परिस्थितीकडे पाहतो. प्रश्न विचारतो, गृहीतकांना आव्हान देतो.वेगवेगळ्या कल्पना,संकल्पना यांचे एकत्रिकरण करतो.
सर्जनशीलता या कामगिरी स्तर दर्शकामध्ये विद्यार्थी प्रवाह(निर्झर),पर्वत व आकाश या स्तरावर आहे म्हणजे काय हे समजून घेऊ या.
अ.क्र. | प्रवाह (निर्झर) (Stream) | पर्वत (Mountain) | आकाश (Sky) |
|
1. | या स्तरावरील विद्यार्थी कृती करताना निरीक्षण करतो. नाविन्यपूर्णरित्या कृती पूर्ण करण्यासाठी पूर्वज्ञानाचा वापर करतो. | या स्तरावरील विद्यार्थी कृती करण्यासाठी नियोजन करतो व त्यासाठी पूर्वज्ञान वापरतो. कृती करताना दिलेल्या सूचनांपेक्षा वेगळे मार्ग ओळखतो. | या स्तरातील विद्यार्थी कृती करताना स्वतःची धोरणे आणि नवीन दृष्टिकोन तयार करतो. | |
2. | सूचना देतो, आवश्यक असलेल्या कृतींच्या भागांना नावे देतो. इतरांनी केलेल्या नाविन्यपूर्ण कृतींचे अनुकरण करतो. | कृती करण्यासाठी नवीन मार्गांचा अवलंब करतो. कृती करण्यासाठी विविध साधनांचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो. | कृती करताना पायऱ्यांची योग्य प्रकारे मांडणी करतो. कृतीचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वरूप तयार करण्यामध्ये स्वारस्य दाखवतो. | |
3. | एखादे कार्य करण्याचे अनेक पर्याय ओळखतो. कार्य पूर्ण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो.
| कृती करताना वापरात असलेल्या साधनांची हाताळणी करण्यासाठी स्वतः नियम तयार करतो.
| कृती करताना नवनवीन साधने ,तंत्रज्ञान व ही साधने आणि तंत्रज्ञान वापरताना स्वयम आधारित नियम वापरतो. | |
4. | कृतीशी संबंधित त्याच्या आजूबाजूला असलेल्या कल्पनांचा वापर करतो.
| कृती करत असताना कृती आणि जीवनातील अनुभव यांची सांगड घालून तपशीलवार माहिती देतो.
| स्वतःच्या अनुभवाचे तपशीलवार वर्णन करतो. नाविन्यपूर्ण उपाय सुचवतो आणि अमलात आणतो. | |
5. | प्रवाह स्तरावरील विद्यार्थी नवीन कल्पनांवर काम करू शकतो, परंतु त्याचा उद्देश पूर्णपणे समजू शकत नाही.
| एखादी कृती /कलाकृती तयार करण्यासाठी स्वतः प्रयत्न करतो.
| कृतीच्या हेतू बद्दल नवीन कार्यपद्धती तयार करतो. कृतीच्या हेतू बद्दल स्वतंत्रपणे प्रश्न विचारून स्वतंत्र नियमावली तयार करतो. | |
6. | एखादी दिलेली वस्तू /कलाकृती तयार करण्यासाठी आवश्यक घटकांना ओळखतो आणि एकत्र करतो.
| कृती करण्यासाठी आवश्यक घटकांना ओळखतो व त्यांना एकत्र करतो. कृती उत्स्फूर्तपणे पार पाडतो. कृती संबंधी नवीन कल्पनांचे लेखन करतो. | विविध घटना आणि इतरांनी केलेल्या कृतीचे निरीक्षण करून टीकात्मक परीक्षण करतो. ही कृती वेगवेगळ्या दृष्टिकोनातून करावी यासाठी विचार करतो. | |
7. | कृतीशी संबंधित स्वतः निवडलेल्या मुद्द्यांवर किंवा घटकांवर दोन वाक्य लिहितो. पुढे काय घडू शकते यावर अंदाज व्यक्त करतो. | इतरांनी कृती सादर केल्यावर त्याचे चिकित्सक परीक्षण करत. एखादे कार्य वेगळ्या दृष्टिकोनातून पार पाडण्यासाठी विचार करतो. | कृती संदर्भात समवाय असतो. मित्र किंवा प्रौढांसोबत सविस्तर चर्चा करून शकतो व टिकवू शकतो. | |
याची अधिक माहिती आपण पुढे पाहू या.
डॉ.प्राची राहुल चौधरी
सेवासदन अध्यापिका विद्यालय पुणे .
सदस्य –समग्र प्रगती पत्रक (HPC)पायाभूत स्तर (MSCERT पुणे)

