संविधान दिवस

दिनांक २५/११/२०२५ रोजी विंग कमांडर अभय जोशी आरोग्य व शिक्षण निधी यांच्या मार्फत बा .मो .वा सेवासदन अध्यापिका विद्यालयातील ४ विद्यार्थ्यांना शिक्षण निधी देण्या आला. धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान , धायरी इथे हा कार्यक्रम घेण्यात आला . कार्यक्रमांमध्ये मा.डॉ.प्रदीप आवटे, मा.सुभाष वारे , मा.ज्योतीताई जोशी, मा.सोपान उर्फ काका चव्हाण, अनिकेत सोपान (काका ) चव्हाण हे सर्व प्रमुख पाहुणे कार्यक्रमाला लाभले होते. पाहुण्यांनी बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमांमध्ये निधी प्रत्येक विद्यार्थिनीला देण्यात आला. कार्यक्रमांमध्ये बा.मो.वा. सेवासदन अध्यापिका विद्यालयातील प्रभारी प्राचार्य मा.पालवणकर मॅडम याही उपस्थित राहिल्या. कार्यक्रम हा खूप छान पार पडला. विद्यालयातील द्वितीय वर्ष विद्यार्थी शेख यास्मिन हिने आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रम हा सविधान दिनाच्या निमित्त ठेवण्यात आला.

Scroll to Top