आरती स्पर्धा

दि.25 – 8 -2025
बा.मो.वा. सेवासदन अध्यापिका विद्यालय पुणे-30 (प्रार्थना हॉल)

  आज दिनांक 25 ऑगस्ट वार सोमवार गणेश चतुर्थी निमित्त सेवासदन अध्यापिका विद्यालय कॉलेजमधे आरती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम वर्ष व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. येणाऱ्या गणपती उत्सवासाठी व नवरात्री उत्सवासाठी सदर स्पर्धेचा विद्यार्थिनींनी आनंद घेतला. लॉट क्रमांक १ द्वितीय वर्षाचा होता. व लॉट क्रमांक २ प्रथम वर्षाचा होता. प्रथम व द्वितीय वर्षाने छान प्रकारे आरत्या सादर केल्या त्यानंतर परीक्षक माननीय प्रभारी प्राचार्य पालवणकर मॅडम व सांस्कृतिक प्रमुख जाधव मॅडम यांनी आरती स्पर्धेचे परीक्षण केले व निकाल जाहीर केला प्रथम क्रमांक द्वितीय वर्षाचा आला व द्वितीय क्रमांक प्रथम वर्षाचा आला .अशा पद्धतीने आनंदी वातावरणात उत्साह पूर्ण स्पर्धा पार पाडली.
Scroll to Top